पाणी हेच जीवन | Paani hech jivan January 14, 2024May 15, 2021 by Manisha Savekar Contents hide 1 पाणी हेच जीवन मराठी निबंध 800 शब्द 2 भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद 3 भारत-चीन यांच्यातील वाद 4 भारत-बांगलादेश यांच्यातील वाद 5 पाणी हेच जीवन मराठी निबंध 500 शब्द पाणी हेच जीवन मराठी निबंध 800 शब्द एखादी गोष्ट विपुल प्रमाणात उपलब्ध असली की माणसाला तिची किंमत वाटत नाही. पाणी हा असाच एक विषय ! या विषयाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन जर आपण बदलला नाही तर आज ना उद्या आपल्याला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागेल हे स्पष्ट आहे.पाणी हेच जीवन आहे. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी वाचवलेच पाहिजे. ‘पुढचे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरुन होईल’ असे या क्षेत्रातील विचारवंत नेहमी म्हणत असतात. पण हा धोक्याचा इशारा आपण अजूनही गांभीर्याने घेत नाही. हे कटू वास्तव आहे.जलसंपत्तीच्या एकूणच भवितव्याविषयी काळजीची परिस्थिती सध्या जगभरात निर्माण झाली आहे. प्रामुख्याने उत्पादन कमी आणि लोकसंख्या अधिक अशी अवस्था असणाऱ्या विकसनशील देशांत तर ही परिस्थिती गंभीर आहे. या देशांच्या यादीत भारताचासुद्धा समावेश होतो हे खेदाने म्हणावे लागत आहे. जगातील सुमारे ७४.८ कोटी जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. भारतातील सव्वाशे कोटी जनतेपैकी अधिकांश जनतेला शुद्ध पाण्यासाठी दर दिवशी संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागातील या जनतेला शुद्ध पाणी मिळणे तर दूरचीच गोष्ट पण साध्या पाण्यासाठीसुद्धा त्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागते.‘पाणी हे जीवन आहे.’ पाण्याशिवाय सृष्टीतील एकही जीव जगू शकत नाही. पाण्याशिवाय शेती नाही की उद्योगधंदे नाहीत. पाणी नाही तर अस्तित्व नाही. पण, तरीही ‘पाणी’ या विषयाबद्दल अजूनही म्हणावी तितकी जागृती झालेली दिसत नाही. पृथ्वीवर आज सात अब्ज पेक्षा जास्त लोक राहतात. पुढील तीन दशकांत त्यात आणखी दोन अब्ज लोकांची भर पडणार असून जगाची एकूण लोकसंख्या नऊ अब्ज होईल, असे संकेत अभ्यासकांनी दिले आहेत. २०५० पर्यंत पाण्याच्या जागतिक मागणीत ५५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत जगभरातील जलस्रोतांच्या वापरासंदर्भातील धोरणात बदल केला नाही तर २०३० पर्यंत पाण्याच्या एकूण गरजेच्या केवळ ६० टक्केच पाणी शिल्लक राहील, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणी अहवालात देण्यात आला आहे. मागणी आणि पुरवठा यात योग्य समतोल राखण्याची गरज आहे. ‘वार्षिक जागतिक पाणी विकास अहवालानुसार’ पाण्याची मागणी आणि पुरवठा याबाबत जगाला संघर्ष करावा लागणार आहे.जगातील प्रत्येक देशाने त्यांच्या धोरणात सकारात्मक बदल घडवून आणले तरच भविष्यात पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेची शाश्वती आहे. अशाश्वत विकासाच्या वाटेवरील मार्गक्रमण आणि विविध देशांतील सरकारचे धोरणात्मक अपयश यामुळे जलस्रोतांची गुणवत्ता व उपलब्धतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. वाढते जागतिक तापमान हा आता सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जगात फक्त 2.5 टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करणे खूपच गरजेचे आहे. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. त्याचा काहीच फायदा होत नाही. पावसाळ्यात पडणारे पाणी साठवले गेले तर गरजेच्या वेळी या पाण्याचा उपयोग होउन उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होईल.जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढत असतानाच भूगर्भातील जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. जगभरातील जलस्रोत कोरडे पडण्यामागे पर्यावरणाचा ऱ्हास हेच कारण आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.पावसाचा लहरीपणा वाढला आहे. त्याचबरोबर वेळी-अवेळी पाऊस आणि वेळी-अवेळी वादळ अशा बदललेल्या रूपाचा मानवी जीवनावर परिणाम होऊ घातला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याचे साठे हे कडक उन्हामुळे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे.नद्यांचा प्रवाह आणि पाणीवाटपावरून भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशात अनेक वर्षापासून वाद सुरू आहेत.भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंध, चिनाब, रावी, आणि सतलज नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत एक करार झाला होता. भारतातून उगम पावणाऱ्या सिंधू नदीच्या प्रवाहात बदल केला तर पाकिस्तानात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या करारानुसार भारत सिंधू नदीच्या प्रवाहात बदल करणार नाही, असे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये भारत बेकायदा पाणी अडवत असल्यामुळे त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे, असा आरोप पाकिस्तानने भारतावर केला. त्यावर भारताने पाकिस्तानकडून भारतावर होणारा हा आरोप फेटाळून लावला. या दोन्ही देशांमध्ये पाणी हे एक तणावाचे कारण आहे. भारत-चीन यांच्यातील वादआसामच्या वरच्या भागात ब्रह्मपुत्रा नदीवर चीन धरण बांधत आहे. पाणीवाटपावरून दोन्ही देशांत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर आतापर्यंत तीन धरणे बांधून पाणी अडवले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्याचा चीनचा इरादा आहे. त्यामुळे भारतच नव्हे तर बांगलादेश आणि भूतानमध्ये दुष्काळ आणि पूरस्थितीचा धोका वाढणार आहे. चीनने ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलला तर बांगलादेशात भयंकर परिस्थिती निर्माण होईल. सध्या भारत आणि चीनमध्ये अनेक वर्षापासून ब्राह्मपुत्राच्या पाणीवाटपावरून चर्चा सुरू आहे, पण अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाहीभारत-बांगलादेश यांच्यातील वादपाण्यावरून भारत आणि बांगलादेशात पहिले युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि बांगलादेशात गंगेच्या पाणीवाटपावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दोन्ही देशांचे अधिकारी दर वर्षी या मुद्द्यावर चर्चा करतात, पण अजूनपर्यंत ठोस निर्णय घेण्यात त्यांना यश आले नाही. भारत-बांगलादेशात गंगा नदीच्या पाण्याबात १९९६ मध्ये ३१ वर्षांचा करार झाला होता. देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात पाणीवाटपावरून चर्चा झाली होती, तरीही हा वाद शमलेला नाही. हा सर्व जागतिक पातळीवर चिंतेचा प्रश्न असताना आपण आपल्या परीने एक खारीचा वाटा तर उचलू शकतोच ना. यासाठी स्वतःला काही सवयी लावल्याच पाहिजेत.गरज नसताना घरातील नळ चालू ठेवणे, सार्वजनिक नळांच्या तोट्यात काढून पाणी वाहू देणे, गळणारे नळ दुरूस्त न करणे अशा चुकीच्या सवयी सोडून दिल्या पाहिजेत. शहरांतून गटारे, सांडपाणी, उद्योगांमधील रासायनिक द्रव्य प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदुषित होते. हे सर्व टाळण्यासाठी जागरुक नागरीक म्हणून आपल्या सर्वांचं याकडे लक्ष हवं. पाण्याच्या पुनर्वापरानेही पाणीटंचाई बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. घरातील धुण्याचा, आंघोळीचे वापरलेले पाणी बागेतील झाडांना वापरू शकतो. गावातील ओढे, शहरातील गटारे, कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतर दुय्यम कारणांसाठी उपयोगात आणणे शक्य आहे. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. ” बळ बुद्धी वेचूनिया शक्ती उदक चालवावे युक्ती “असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे युक्तिने पाणी चालवायला शिकलो तर भावी पिढ्या आपल्याला धन्यवाद देतील. संपूर्ण मानव जातीचे भविष्य उज्वल होईल.पाणी हेच जीवन मराठी निबंध 500 शब्द पाणी हा पृथ्वीवरील जीवनाचा अत्यावश्यक आणि अपरिवर्तनीय घटक आहे. त्याचे महत्त्व केवळ रासायनिक संयुगाच्या पलीकडे आहे; त्याऐवजी, ते जीवनसंजीवनी म्हणून काम करते, जे सर्व सजीवांना टिकवून ठेवते. “पाणी हे जीवन आहे” हे वाक्य पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी, जैवविविधतेला पाठिंबा देण्यासाठी आणि मानवांचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी पाण्याचे गहन महत्त्व अंतर्भूत करते.पहिली गोष्ट म्हणजे, पर्यावरण आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. हे सूक्ष्म जीवांपासून ते मोठ्या सस्तन प्राण्यांपर्यंत असंख्य प्रजातींसाठी निवासस्थान म्हणून काम करते. गोड्या पाण्यातील परिसंस्था, जसे की नद्या, तलाव आणि पाणथळ जागा, जैवविविधतेने समृद्ध आहेत, ज्या वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या विस्तृत श्रेणीला आधार देतात. ही परिसंस्था विविध प्रजातींसाठी अन्न, निवारा आणि नवीन जन्माला जागा प्रदान करतात, निसर्गाच्या नाजूक समतोलात योगदान देतात. पाण्याशिवाय, या परिसंस्था कोलमडून पडतील, ज्यामुळे संपूर्ण अन्न निर्मिती संस्थेवर नकारात्मक प्रभाव पडेल.प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी पाणी देखील मूलभूत आहे. ही यंत्रणा ज्याद्वारे वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पती प्राथमिक उत्पादक म्हणून, अन्नसाखळीचा आधार बनतात, तृणभक्षी प्राण्यांचे आणि पर्यायाने मांसाहारी प्राण्यांचे पोट भरतात. पुरेशा पाणीपुरवठ्याशिवाय, झाडे प्रकाशसंश्लेषण करू शकत नाहीत, ज्यामुळे संपूर्ण परिसंस्थेमध्ये व्यत्यय येतो. जीवनाचा परस्परसंबंध पाणी आणि विविध प्रजातींचे अस्तित्व यांच्यातील अतूट दुवा अधोरेखित करतो.शिवाय, मानवाच्या जगण्यासाठी आणि आरोग्यासाठी पाणी अपरिहार्य आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा मुलभूत मानवी हक्क आहे, जो संयुक्त राष्ट्रांनी मान्य केला आहे. हायड्रेशन, स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी पाणी आवश्यक आहे, जे संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देते आणि जलजन्य रोगांचा प्रसार रोखते. स्वच्छ पाण्याचा अभाव असमानतेने लोकसंख्येवर परिणाम करतो, गरीबी, असुरक्षितता आणि असमानतेच्या समस्या वाढवतो.जीवन टिकवून ठेवण्याच्या भूमिकेबरोबरच, पृथ्वीच्या भविषालाआकार देण्यातही पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उन, हवामान आणि मुख्यत्वे पाण्याद्वारे चालवलेले, लाखो वर्षांपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुंदर शिल्प आहे. नद्या-खोर्या, हिमनद्या पर्वतांना आकार देतात आणि किनारी भागात, सागर किनाऱ्यावर सागराला सुशोभित करतात. पाण्याचे गतिमान स्वरूप पृथ्वीच्या भूगर्भीय विविधतेमध्ये योगदान देते आणि हवामानावर प्रभाव टाकते, ज्यामुळे ते नैसर्गिक जगामध्ये एक प्रभावशाली शक्ती बनते.तरीही, त्याचे निर्विवाद महत्त्व असूनही, जलस्रोतांना प्रदूषण, अतिउपसा आणि हवामान बदल यासह अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. मानवी हस्तक्षेप, जसे की औद्योगिक विसर्जन आणि कृषी प्रवाह, जलप्रदूषणात योगदान देतात, गोड्या पाण्याच्या स्त्रोतांची गुणवत्ता धोक्यात आणतात. कृषी आणि शहरी उद्देशांसाठी भूजलाचा अतिरेक केल्याने जलचरांचा ऱ्हास होतो, ज्यामुळे पर्यावरणातील नाजूक संतुलन बिघडते. हवामान बदलामुळे पाण्याची टंचाई आणि हवामानाच्या तीव्र घटना वाढतात, ज्यामुळे पाणी व्यवस्थापन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना अतिरिक्त आव्हाने निर्माण होतात.शेवटी, “पाणी हे जीवन आहे” हा वाक्यांश पाणी आणि पृथ्वीवरील सर्व जीवनातील सखोल परस्परसंबंध अंतर्भूत करतो. पर्यावरण आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यापासून ते मानवी अस्तित्वासाठी एक महत्त्वपूर्ण संसाधन होण्यापर्यंत, पृथ्वीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य घडवण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावते. पाण्याचे आंतरिक मूल्य ओळखणे आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे ही पुढच्या पिढ्यांसाठी त्याची उपलब्धता निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले आहेत.