भारतीय संस्कृती

 भारतीय संस्कृती 

            भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला विश्वातील सर्व संस्कृतींची जननी मानले जाते. जगण्याची कला असो किंवा विज्ञान आणि राजकीय क्षेत्र असो , भारतीय संस्कृतीचे सदैव विशेष स्थान राहिले आहे. अन्य देशांच्या संस्कृती काळा नुसार नष्ट होत राहिल्या परंतु भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आपले परंपरागत अस्तित्व टिकवून आहे. 
            भौगोलिक दृष्टीकोनातून भारत विविधतेचा देश आहे, पण सांस्कृतिक दृष्टीकोनातून भारतात एकतेचे रूप प्राचीन काळापासून दिसते. विविधतेतून एकता हे भारताचे वैशिष्ट राहिले आहे. हिमालय पर्वत पूर्ण देशाचे गौरवाचे प्रतिक आहे. गंगा, यमुना, नर्मदा सारख्या नद्यांना माता मानले जाते. राम, कृष्ण, शिव यांची आराधना युगानुयुगे केली जाते. 
            सर्वांमध्ये भाषेची विविधता आहे; पण संगीत, नृत्य, नाटके यांच्या मूलभूत स्वरूपांमध्ये कमालीची समानता आहे. भारतीय संस्कृती प्रेम, सन्मान, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर या गुणांनी समृद्ध आहे.
              भारतीय संस्कृती एक महान जीवनधारा आहे जी प्राचीन काळापासून सतत प्रवाहित आहे. अशा प्रकारे भारतीय संस्कृती स्थिर आणि अद्वितीय आहे जिच्या संरक्षणाची जबाबदारी वर्तमान पिढीवर आहे. एका राष्ट्राची संस्कृती त्या लोकांच्या ह्रदयात आणि आत्म्यात बसलेली असते. सर्वांगीणता, विशालता, उदारता आणि सहिष्णुता या गुणांमुळे इतर संस्कृतींच्या तुलनेत भारतीय संस्कृती महान संस्कृती आहे. 
                                                     जय हिंद 
                                                         जय महाराष्ट्र .

6 thoughts on “भारतीय संस्कृती”

  1. खरोखरच भारतीय संस्कृती ही एक रसायन आहे. ही भूमी पवित्र आहे. म्हणूनच इथे संत महातम्याना वारंवार जन्म घ्यावासा वाटतो.

    Reply
  2. खरंच म्हणाल्याप्रमाणे भारतीय संस्कृती एक जीवनधारा आहे.कारण या देशात पहायला मिळत ते कोणत्याच देशात पहायला मिळत नाहीं अप्रतिम असे निबंधलेखन आहे.

    Reply

Leave a Comment