माझा आवडता लेखक – रणजित देसाई मराठी निबंध

मराठी साहित्य विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय लेखक म्हणून रणजित देसाई यांना ओळखले जाते. त्यांच्या साहित्याने मराठी वाचकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांची लेखन शैली, कथानकाची गुंफण, संवेदनशील लेखन शैली यामुळे वाचकांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, नाटक यांचा समावेश होतो. पण ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये त्यांची विशेष प्रतिभा दिसून येते.

हे पण वाचा 

माझा आवडता ॠतू शरद | मराठी निबंध

‘स्वामी’ ही रणजीत देसाई यांची ऐतिहासिक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ही कादंबरी थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी मराठी साहित्य विश्वातील एक मानबिंदू मानली जाते. त्यांच्या लिखाणातून इतिहास जिवंत होतो असं वाटतं. त्यातील व्यक्तिरेखा, निसर्ग वाचकांच्या मनावर खोलवर रुजल्या जातात कोरल्या जातात. त्यांची दुसरी कादंबरी ‘श्रीमान योगी’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. ती वाचकांना प्रेरणा देऊन जाते.

रणजीत देसाई यांच्या लिखाणाची भाषा सहज, सोपी, साधी, हृदयाला स्पर्श करणारी आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमधील कथांमधील पात्रे वाचकांना आपलेसे वाटतात. म्हणूनच रणजित देसाई माझे आवडते लेखक आहेत.

माझा आवडता लेखक – रणजित देसाई, मराठी निबंध - 600 शब्द

साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते, आणि या आरशात समाजाचे खरे प्रतिबिंब दाखवणारे लेखक फार थोडे असतात. रणजित देसाई हे त्यामधीलच एक तेजस्वी व्यक्तिमत्व. मराठी साहित्य विश्वाला लाभलेले प्रतिष्ठित असे लेखक. त्यांच्या लेखन शैलीत एक गोडवा जाणवतो. पात्रांची जिवंत मांडणी, इतिहासातील पात्रांना दिलेला नवा आयाम आणि मानवी भावनांचे  बारकावे त्यांच्या साहित्य कृती मधून दिसून येतात. यामुळेच ते माझे आवडते लेखक ठरले आहेत.

रणजीत देसाईंची साहित्यिक कारकीर्द

रणजीत देसाई यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड या गावी इनामदार घराण्यात  झाला. त्यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी आजीकडे कोल्हापुरातच झाले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. ते सुरुवातीच्या काळात कथा लिहित असत.  त्यांना वाचनाचे प्रचंड वेळ होते. संगीताची आवड होती. संवेदनशील मन, निरीक्षणाची, मनन- चिंतनाची त्याला जोड होती. आणि यामुळेच रणजित देसाई एक नामवंत लेखक म्हणून घडत गेले.

हे पण वाचा 👉 माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध

स्वामी – एक अमर साहित्यकृती

राजाराम महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांची ‘रूपमहाल’ ही कथा ‘राजारामीय’ या वार्षिक अंकात प्रसिद्ध झाली. १९४७ साली ‘प्रसाद’ मासिकाने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत त्यांच्या ‘भैरव’ या कथेला पारितोषिक मिळाले. रणजीत देसाई यांनी ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर मोठ्या प्रमाणावर लेखन केले. त्यांची स्वामी, श्रीमान योगी यासारख्या ऐतिहासिक कादंबऱ्या आजही मराठी वाचकांच्या मनात आढळ स्थान मिळवून आहेत, टिकवून आहेत. त्यांच्या साहित्यातून इतिहास आणि तत्कालीन समाज जीवन यांचे सुंदर चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

माझा आवडता लेखक – रणजित देसाई मराठी निबंध

‘स्वामी’ ही रणजीत देसाई यांची ऐतिहासिक कादंबरी त्यांच्या साहित्यकारकिर्दीचा कळस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोरले माधवराव पेशवे यांचे जीवन या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. माधवरावंच्या हळव्या भावना, त्यांच्या जीवनातील संघर्ष रणजित देसाई यांनी अत्यंत संवेदनशील पणे मांडला आहे.

हे पण वाचा 👉 चांद्रयान-3, एक अवकाश सफर

इतिहासातील घटना, पात्रं त्यांच्या लेखणीतून जिवंत झाले आहेत. माधवरावांचा करून अंत वाचकांच्या हृदयाला भिडतो. स्वामी ही कादंबरी वाचत असताना वाचक इतिहासात डोकावून पाहतो. ही कादंबरी केवळ ऐतिहासिक माहिती देत नाही. ती आपल्याला भावनिक दृष्ट्या बांधून ठेवते. माधवराव आणि रमाबाई यांचा नाजुक आणि नितळ प्रेम संबंध पाहून वाचक भारावून जातो. त्यांच्या नात्यातील हळुवारता, समरसता, ओढ  हीच या कादंबरीची ताकद आहे.

‘श्रीमान योगी’ या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन रेखाटले आहे. आपण शिवाजी महाराजांची कर्तुत्वगाथा इतिहासकारांच्या लेखनातून अभ्यासतो, ऐकतो. पण रणजीत देसाई यांच्या लेखणीतून शिवाजी महाराजांचे माणूस पण, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष अधिक ठळकपणे पुढे येतो. रणजीत देसाई यांनी शिवाजी महाराजांचा राजकीय दृष्टिकोन, शौर्य, त्यांची नीतिमत्ता, त्यांचे कौटुंबिक जीवन या सर्व बाबी प्रभावीपणे मांडल्या आहेत.

‘श्रीमान योगी’ ही एक केवळ ऐतिहासिक कादंबरी नाही तर ती वाचकांना प्रेरणा देणारे लेखन आहे. या कादंबरीतील लेखन शैलीत नेमकेपणा आणि साधेपणा आहे. त्यांची भाषा प्रासादिक असली, तरीही ती सहज समजणारी आहे. ऐतिहासिक घटनांमध्ये कादंबरी लेखन करत असताना कल्पना रंजनाचा अंश टाकावाच लागतो. पण रणजीत देसाई यांनी त्यामध्ये नेहमीच वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिले आहे. कुठेही अतिशयोक्ती किंवा ऐतिहासिक घटनांची मोडतोड नाही.

त्यांच्या लेखनात भावनिकता आणि वास्तवता यांचा समतोल दिसतो. पात्रांचे मनोविश्लेषण नेमकेपणाने ते उलगडून दाखवतात. संवादाची खोली आणि वातावरण निर्मिती याबाबतीत त्यांचे लेखन इतर लेखकांपेक्षा वेगळे दिसून येते. वाचकांना त्यांच्या लेखनातून भूतकाळ आपल्या डोळ्यासमोर उलगडल्यासारखा वाटतो.

रणजीत देसाईंचा समाजावर आणि वाचकांवर प्रभाव

इतिहासाचे वाचन बहुतेकांना कंटाळवाणे वाटते. रणजीत देसाई यांच्या साहित्याने मराठी वाचकांना इतिहासाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी दिली. त्यांच्या कादंबऱ्यामुळे अनेक वाचकांना इतिहासात रस निर्माण झाला. त्यांच्या कादंबऱ्यांमधून केवळ इतिहासाचे दर्शन घडत नाही तर त्या माणसातील माणुसकी ही अधोरेखित होते. रणजीत देसाई यांच्या साहित्याचे वाचन करत असताना त्यातील पात्रांशी आपसूकच नाते जुळते. त्यांच्या लेखणीचा गोडवा मला नेहमीच आकर्षित करतो.

इतिहासाच्या पोटात दडलेल्या कथांना त्यांनी दिलेले सजीव रूप हे मला खूपच भारावून टाकते. त्यांच्या साहित्याचे वैभव प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचावे असे मला नेहमीच वाटते. माझ्या दृष्टीने रणजित देसाई केवळ लेखक नाहीत तर ते वाचकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्यातून मला नेहमीच शिकायला मिळाले आहे. त्यामुळे ते माझे आवडते लेखक आहेत आणि नेहमीच राहतील.

Leave a Comment