हे गीत आपण सर्वजण लहानपणापासून आपल्या आईकडून,आजी कडून ऐकत आलोय. आपल्या सर्वांनाच आपल्या बालपणापासून चंद्राबद्दल कुतूहल वाटत आले आहे. चंद्राला आपण मामा म्हणतो. हा चांदोमामा कसा दिसत असेल, त्यावर दिसणारे ते हरीण खरोखरच तिथे असेल का? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात.
अमेरिकेने पाठवलेल्या अपोलो यानातून नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर गेले होते. ते चंद्रावर जाणारे पहिले मानव ठरले. मलाही वाटतं की चंद्रावर जावं, चंद्राला जवळून पहावं, तिथली माती, तिथली जमीन कशी आहे ती पहावी, तिथून आपली पृथ्वी कशी दिसते हे पहावे असं खूप वाटतं.
हे पण वाचा 👉 माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध
हे पण वाचा : भ्रष्टाचार निबंध मराठी
हे पण वाचा : समाजावर तंत्रज्ञानाचा प्रभाव मराठी निबंध
आपला भारत देश चंद्राचा अभ्यास करण्यात खूप अग्रेसर आहे. आपल्या देशाच्या चांद्रयान मोहिमेबद्दल मला खूपच अभिमान वाटतो. भारताने नुकतेच 23 ऑगस्ट 2023 या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर आपले चांद्रयान- 3 हे चांद्रयान यशस्वीरित्या उतरवले. त्यामुळे आपला देश युनायटेड स्टेट्स, रशिया, चीन यांच्यानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला आहे. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे.
चांद्रयान- 3 चे यशस्वी लँडिंग ही आपल्या भारत देशाच्या अंतराळ कार्यक्रमाची एक मोठी उपलब्धी आहे. आणि हे शक्य करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
# हे पण वाचा 👉 # मराठी निबंध : मी चंद्रावर गेलो तर
भारत हा एक विकसनशील देश आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रात विकसित होत आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे. एक देश म्हणून भारताने आपली प्रचंड वैज्ञानिक उपलब्धी आणि अवकाश संशोधनातील प्रगती दाखवण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम घेतले आहेत. ऐतिहासिक चांद्रयान प्रकल्प हे त्यातील सर्वात महत्त्वाचे यश आहे. चंद्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि विज्ञान प्रगत करण्याच्या भारताच्या धाडसी योजनेत हे एक मोठे पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीने लोकांना राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना दिली आहे.
# स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठी निबंध
मिशन चांद्रयान मधील पहिले चांद्रयान 22 ऑक्टोबर 2008 या दिवशी लॉन्च करण्यात आले. त्याने चंद्रावरील खनिजांविषयी तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर चांद्रयान- 2 हे 22 जुलै 2019 रोजी लॉन्च करण्यात आले. त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे आणि कुठे आहे हे शोधून काढले. पण त्या वेळेला लेंडर यशस्वीरित्या उतरता आले नाही.
चंद्रयान 3 ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. चंद्रावरील पाण्याच्या बर्फाचा शोध घेणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्यामुळे भविष्यातील मानवी शोधासाठी एक मौल्यवान साधन ठरू शकते. भारताचे चांद्रयान मिशन शांततापूर्ण अंतराळ संशोधनासाठी वचनबद्ध आहे. हे मिशन अंतराळ संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी मदत करेल आणि ते जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देईल.