माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध | Majha Avadta Kavi Marathi nibandh

मित्रांनो आज आपण ‘माझा आवडता कवी’ या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. या लेखातून महत्त्वाचे मुद्दे देण्याचा प्रयत्न केला आहे. हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.

माझा आवडता कवी

माझा आवडता कवी मराठी निबंध

माझा आवडता कवी,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक ‘कुसुमाग्रज’ हे आहेत, ज्यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते, ते महाराष्ट्रातील एक प्रमुख कवी, नाटककार, कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी मानले जातात. प्रेम, निसर्ग, सामाजिक समस्या, दीनदुबळ्यांची दुर्दशा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले.

# हे पण वाचा 👉 # मराठी निबंध : मी चंद्रावर गेलो तर

# स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठी निबंध

हे पण वाचा : भ्रष्टाचार निबंध मराठी 

हे पण वाचा : समाजावर तंत्रज्ञानाचा प्रभाव मराठी निबंध 

‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’ इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध काव्य संग्रहांचा समावेश आहे. त्यांनी नाटके आणि कादंबऱ्याही लिहिल्या आणि त्यांची नाटके मराठी रंगभूमीवरील काही उत्कृष्ट नाटकात गणली जातात. उदा.’नटसम्राट’. कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले, त्यात त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी (1974) पुरस्काराचा समावेश आहे. त्यांना 1987 साली ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी नाशिक येथे झाला.कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले.

हे पण वाचा : पाणी हेच जीवन

कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती.ती सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांनी कुसुमचा मोठा भाऊ अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले आहे. तेव्हापासून कवी विष्णु वामन शिरवाडकर हे कवी ‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या हयातीत त्यांनी मराठी साहित्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या असंख्य कविता, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या.त्यांची ‘कणा‘ ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. मला ती खूप आवडते.

‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

कवीतेच्या या ओळी किती बोलक्या वाटतात. वास्तवतेचं दर्शन किती नेमक्या शब्दांत गुंफलय. सहज सुंदर शब्दात ते पुरात सर्वस्व गमावलेल्या युवकाचं चित्रण ते कवितेत करतात.पण कुठेच त्यात असहायता दिसत नाही.उलट कठीण प्रसंगातही उभं रहाण्याची प्रेरणा मिळते.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, फक्‍त लढ म्हणा’!

या ओळी वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. या आणि अशा अनेक कुसुमाग्रजाच्या कवीता युवकाना प्रेरणा देतात.

कुसुमाग्रजांचे साहित्यावरील प्रेम आणि लेखक म्हणून त्यांची नैसर्गिक प्रतिभा यामुळे त्यांना मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी म्हणून ओळखले जाते.

हे पण वाचा 👉 चांद्रयान-3, एक अवकाश सफर

असा हा माझा आवडता कवी १० मार्च, १९९९ रोजी अनंतात विलीन झाला.पण त्यांच्या कवितेतून ते नेहमीच आपल्या सर्वांच्या मनात आहेत.

प्र. कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह कोणता आणि कधी प्रसिद्ध झाला ?

उत्तर – ‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला.

प्र. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते ?

उत्तर – कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते.

प्र. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर – 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment