भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi

भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi

भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi

या लेखात आपण भ्रष्टाचाराच्या विषयावर सविस्तर चर्चा करू. भ्रष्टाचार हा केवळ आपल्या वैयक्तिक जीवनासाठीच शाप नसून तो राष्ट्राच्या विकासाला बाधक आहे. तुम्हाला कोणत्याही परीक्षेत कधीही भ्रष्टाचारावर विचारले जाऊ शकते.

केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर देशाच्या विकासासाठीही तुम्हाला संपूर्ण माहिती असली पाहिजे – भ्रष्टाचार म्हणजे काय? याचे कारण काय? साइड इफेक्ट्स काय आहेत? आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? तुमच्याकडे याबाबत संपूर्ण माहिती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा देश भ्रष्टाचारमुक्त करण्यात हातभार लावू शकाल.

प्रस्तावना

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट+आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट किंवा बिघडलेले आणि आचार म्हणजे आचरण. बिघडलेले आचरण म्हणजेच भ्रष्टाचार, जे कोणत्याही प्रकारे अनैतिक असते. जेव्हा कोणी व्यक्ती सामाजिक नियमांच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या मार्गांचा वापर करतो, तेव्हा त्या व्यक्तीला भ्रष्टाचारी असे म्हणतात.

आपल्या देशात भ्रष्टाचार खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे. आज आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पसरलेला आहे. आज आपला देश पूर्ण जगात भ्रष्टाचाराच्या बाबतीत 94 व्या स्थानावर आहे.

हे पण वाचा : समाजावर तंत्रज्ञानाचा प्रभाव मराठी निबंध 

हे पण वाचा 👉 चांद्रयान-3, एक अवकाश सफर

हे पण वाचा : माझा आवडता सण दिवाळी

हे पण वाचा 👉 नवीकरणीय/अक्षय ऊर्जा संसाधनांचे वाढते महत्त्व मराठी निबंध

भ्रष्टाचाराचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये काळाबाजार, जाणून बुजून किमती वाढवणे, लाचखोरी, पैसे घेऊन काम करणे, स्वस्त वस्तू  आणून जास्त किंमतीत विकणे, निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटणे, ब्लॅकमेल करणे, विद्यार्थ्यांचे चुकीचे मूल्यांकन, न्यायाधीशांमार्फत पक्षपाती निर्णय, खंडणी वसूल करणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार आहेत.

केवळ सरकारी कार्यालयातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतो. सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालये आणि अगदी छोट्या कारखान्यांमध्ये भ्रष्टाचारासारख्या समस्या आपल्याला दिसतात.

भ्रष्टाचाराचा सर्वात वाईट परिणाम गरीब आणि असहाय लोकांवर होतो. गोरगरीब माणसे आपले छोटे-छोटे काम करून घेण्यासाठी महिनोनवर्षे त्रास सहन करत राहतात, पण त्यांचे छोटे कामही हस्तक्षेपाशिवाय होऊ शकत नाही.

भ्रष्टाचाराची कारणे

असंतोष जेव्हा एखाद्याकडे त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची कमतरता असते तेव्हा तो व्यक्ती भ्रष्ट आचरण करण्यासाठी विवश होतो.
स्वार्थ आणि असमानता – भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा भ्रष्ट आचरण करण्यासाठी असमानता, आर्थिक, सामाजिक किंवा सन्मान, पद, प्रतिष्ठा ही सुद्धा कारणे असू शकतात. स्वार्थ आणि आणि इर्षा या भावना सुद्धा व्यक्तीला भ्रष्ट आचरण करण्यासाठी विवश करू शकतात.

हे पण वाचा 👉 माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध

# हे पण वाचा 👉 # मराठी निबंध : मी चंद्रावर गेलो तर

# स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठी निबंध

हे पण वाचा : माझे कुटुंब मराठी निबंध

भारतात वाढत चाललेला भ्रष्टाचार

भ्रष्टाचार हे एका रोगाप्रमाणे आहे. आज भारतात भ्रष्टाचार खूप वेगाने वाढत आहे. वेळीच त्याला नाही रोखलं तर पूर्ण देश याच्या आहारी जाऊ शकतो. भ्रष्टाचाराचा प्रभाव अत्यंत व्यापक स्वरूपात आहे.

भ्रष्टाचाराचे तोटे

  • भ्रष्टाचारामुळे आपल्या देशाचा विकास थांबल्यासारखा झाला आहे.
  •  भ्रष्टाचारामुळे आपला देश प्रत्येक क्षेत्रात दुसऱ्या देशांच्या तुलनेत मागे पडत चालला आहे.
  •  भ्रष्टाचारामुळे सरकारमार्फत बनवलेल्या योजनांचे फायदे गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
  • भ्रष्टाचारामुळे विविध पदांच्या वर आयोग्य लोकांची निवड केली जाते.
  • यांच्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळत नाही. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते.
  • भ्रष्टाचाराचा रोग सरकारी, गैर सरकारी संस्थांमध्ये एवढा पसरलाय की ज्यामुळे सामान्य माणसाला आपले काम करवून घेण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते.
  • भ्रष्टाचारामुळे काळाबाजारी वाढते.कमी किमतीचे साहित्य जास्त किमतीत विकले जाते.
  • माफिया, गुंड या लोकांची पोहोच मोठ्या पुढाऱ्यांपर्यंत असते. त्यामुळे ते दोन नंबरचे धंदे करतात, ज्यामुळे समाज आणि संपत्ती दोन्ही बर्बात होतात.

भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय

भ्रष्टाचार एखाद्या संक्रामक रोगासारखा आहे. समाजाच्या विविध स्तरावर फैलावलेल्या भ्रष्टाचाराचाराला रोखण्यासाठी कठोर दंड व्यवस्था केली जायला हवी. आज भ्रष्टाचाराची ही स्थिती आहे की एखादा व्यक्ती लाच घेण्यासाठी म्हणून पकडला जातो आणि लाच देऊच सुटतो. पण जोपर्यंत भ्रष्टाचारासाठी कठोर कायदे आणि शिक्षा केली जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचार हा रोग वाळवी सारखा आपल्या पूर्ण देशाला खाऊन टाकू शकतो. यासाठी देशातील लोकांमध्येच स्वतःमध्ये इमानदारी, प्रामाणिकपणा विकसित करणे गरजेचे आहे. येणाऱ्या पिढीपर्यंत प्रामाणिकपणाचे फायदे पोहोचवणे गरजेचे आहे.

हे पण वाचा : माझी आई मराठी निबंध

हे पण वाचा : माझा आवडता कवी : ‘बालकवी’

हे पण वाचा : पाणी हेच जीवन

भ्रष्टाचार विरोधी दिवस

भ्रष्टाचार आपल्या नैतिक जीवन मूल्यांवरील खूप मोठा प्रहार आहे. भ्रष्टाचारात सामील असलेले लोक स्वार्थामुळे आंधळे होऊन आपल्या देशाचे नाव बदनाम करत आहेत. जगभरात भ्रष्टाचारा विरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी 9 डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने 31 ऑक्टोबर 2003 ला एक प्रस्ताव जारी करत आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस पाळण्याची घोषणा केली. भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण देश आणि संपूर्ण जग यामध्ये सामील होणे ही एका शुभ घटनेची सुरुवात आहे. कारण भ्रष्टाचार आज सर्व  देश किंवा सर्व जगाची विश्वाची समस्या आहे.

निष्कर्ष

आपण आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते भविष्यात भ्रष्टाचार दूर करू शकतील. त्यावर नियंत्रण ठेवता येईल अशा उपाययोजनाही सरकारला शोधाव्या लागतील. लोकांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे. तरच आपण वाईटाला त्याच्या मुळापासून नष्ट करू शकतो.

Leave a Comment