नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ‘मी चंद्रावर गेलो तर‘ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मी चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध
“चांदोबा चांदोबा भागलास का।
लिंबोनिच्या झाडामागे लपलास का।।”.
हे गीत मी लहानपणापासूनच आईकडून ऐकत आले. त्यामुळे चंद्राबद्दल मला लहानपणापासूनच कुतूहल वाटते. चंद्र कसा असेल, त्यावर दिसणारे ते हरीन खरोखरच तिथे असेल का? असे अनेक प्रश्न मला पडत राहतात. या चंद्रावर मला जाता आले तर किती बरे होईल, असे मला नेहमी वाटते.
# हे पण वाचा : मराठी निबंध : माझा आवडता कवी
मराठी निबंध : माझी शाळा मराठी निबंध
मी चंद्रावर गेले तर मला चंद्राला जवळून पाहता येईल. तिथून मी आपली पृथ्वी कशी दिसते हे पण पाहीण, तेव्हा मला किती आनंद होईल. मी बाबांकडून ऐकले होते, आपले यान चंद्रावर पाठवले होते. या यानातून माणसांना चंद्रावर पाठवले होते. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यांच्या प्रमाणे मलाही चंद्रावर जायचय. तिथे हवा नाही. तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती पण पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे मी असं ऐकलय की तिथे चालताना सावकाश चाललं तरी चालण्याचा वेग वाढतो. जरा उडी मारली तर ती भरपूर उंच जाते. हवेत तयरंगायला होतं. याचं मला भारी आकर्षण वाटतं. त्यामुळे तिथे गेल्यावर मला भरपूर खेळता येईल. हवं तेवढं, हवं तिथे मला बागडता येईल, इथल्या सारखी बंधने नसतील, गाड्यांची भीती नसेल, ट्रॅफिकची कटकट नसेल, प्रदुषणाची घुसमट नसेल, नियमांचे बंधन नसेल, अभ्यासाची दगदग नसेल, अपेक्षांच ओझ नसेल, मनाची तगमगं नसेल, जीवन कसे आनंदी असेल. किती स्वच्छंदी वातावरण असेल. रोकणार टोकणारं कुणी नसेल. तिथे फक्त माझेच राज्य असेल.
# हे पण वाचा : माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध

किती किती आनंदी वातावरण असेल तिथे. मला पृथ्वी कशी दिसते, तिचा कलर कसा दिसतो. हे बघता येईल. तिथून मला पृथ्वीवर फोन करता येईल का? मी तिथून सगळ्या गमती-जमती फोनवरून सांगेन. पण तिथे फोनचा टाॅवर असेल का? नकोच तो टाॅवर नाहीतर इथल्या सारखे चंद्रावर पण त्याच्या तरंगांचा दुष्परिणाम होईल. चंद्राच्या नैसर्गिक वातावरणात बदल होईल. आपण आपल्या पृथ्वीला स्वतःच्या स्वार्थापोटी प्रदूषित करून ठेवलेय. हवा, पाणी,जमीन या सर्वांना दूषित केलय. त्याचा परिणाम सर्व सजीव सृष्टीला भोगावा लागत आहे. सजीवांच्या अनेक प्रजाती त्यामुळे कायमच्या नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे चंद्रावर मी मुळीच प्रदुषण होवू देणार नाही.

# स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठी निबंध
मी चंद्रावर गेलो तर मला अभ्यास पण करावा लागणार नाही, कारण तिथे शाळाच असणार नाही. मज्जाच मज्जा असणार. पण चंद्रावर हवा, पाणी, जीवसृष्टी काहीच नाही. मग मला एकट्याला करमणार कसं? मला भूक लागली तर जेवण कुठून मिळणार? मी खेळणार कुणाबरोबर? आई-बाबा यांच्या शिवाय तर मी राहूच शकत नाही. नको रे बाबा, मला तर माझी पृथ्वीच आवडते. आपल्या पृथ्वीलाच आपण प्रदूषण मुक्त ठेवूया.