महाराष्ट्र भूषण पुरस्कार यादी – 2023

महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९९७ मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यासाठी दि. ३१ जानेवारी २०२३ पासून या पुरस्काराच्या मानधनाची रक्कम १० लाखांवरून २५ लाख रु. करण्यात आली. २०१२ पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले . पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये करण्यात आली. आता परत शासनामार्फत या पुरस्काराच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. २०१५ ला बाबासाहेब पुरंदरेंना हा सन्मान मिळाल्यानंतर हा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-

1) संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
2) सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
3) पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :-

1) या पुरस्काराची रक्कम रु.25 लाख इतकी असेल.
2) पुरस्कारार्थीला शाल  आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

समितीचे अध्यक्ष व सदस्य :-

1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य   – अध्यक्ष
2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य-   सदस्य
3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य  – सदस्य
4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य  – सदस्य सचिव
5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ- 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी

पुरस्कारीत व्यक्ती कार्यक्षेत्र पुरस्कारीत वर्ष
पु. ल. देशपांडे साहित्य १९९६
लता मंगेशकर कला, संगीत १९९७
विजय भटकर विज्ञान १९९९
सुनील गावसकर क्रीडा २०००
सचिन तेंडुलकर क्रीडा २००१
भीमसेन जोशी कला, संगीत २००२
अभय बंग आणि राणी बंग समाजसेवा २००३
बाबा आमटे समाजसेवा २००४
रघुनाथ माशेलकर विज्ञान २००५
रतन टाटा उद्योग २००६
रा. कृ. पाटील समाजसेवा २००७
नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवा २००८
मंगेश पाडगांवकर साहित्य २००८
सुलोचना लाटकर कला, सिनेमा २००९
जयंत नारळीकर विज्ञान २०१०
अनिल काकोडकर विज्ञान २०११
बाबासाहेब पुरंदरे साहित्य २०१५
आशा भोसले कला, संगीत २०२१
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी ( घोषित )समाजसेवा२०२२
अशोक सराफ (अभिनेता)कला, सिनेमा२०२३

Q.पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला

Ans. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना मिळाला.

प्र. 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर – 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार आणि समाज चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे.

7 thoughts on “महाराष्ट्र भूषण पुरस्कार यादी – 2023”

  1. महराष्ट्र भूषण पुरस्कार -पात्रता ,स्वरूप सांगून आतापर्यंत कोणाला पुरस्कार मिळाले आहेत,याची सविस्तर माहिती या ब्लॉग मधून मिळते, सर्व वयोगटातील व्यक्तींना तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त असा ब्लॉग आहे

    असेच लेखन करीत रहावे.

    Reply
  2. महाराष्ट्र भुषण , पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची महती खूप आहे.. समाजातील विस्कटलेली लाखो संसार प्रपंच पुन्हा नीटनेटक करण्याचं काम आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी श्री बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे.. 🙏
    मानवाला मानवतेची शिकावण देऊन… अंधश्रद्धेपासून आणि नशेपासून बाजूला केल आहे.ज्या प्रमाणे समर्थ रामदासांनी आदर्श राजा घडवला….तसेच या देशामधील तमाम स्त्री-पुरुषांना आणि बाळ संस्कार मार्गदर्शनाखाली लहान मुलांना या देशाचे भावी आदर्श म्हणून उभे करण्याचे काम आदरणीय आप्पासाहेब करत आहेत…. म्हणूनच त्यांच्या कार्याची नोंद जगातील 35 देशांनी घेतली आहे… जय सद्गुरू 🙏

    Reply

Leave a Comment